PCMC : घरावरील तिरंगा ध्वज उतरवून ठेवा; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत (PCMC) घरावर लावलेले तिरंगा ध्वज उतरवून ठेवण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रम देशात सर्वत्र मोठ्या उत्साहात राबविण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत घरावर तिरंगा ध्वज फडकवून मोहिमेत सहभाग घेतला होता.

Ravet : कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

या मोहिमेनंतर ध्वजसंहितेचे पालन होणेही तितकेच आवश्यक असल्याने घरावर तिरंगा ध्वज (PCMC) अद्यापही लावलेला असल्यास नागरिकांनी तो व्यवस्थितरित्या त्वरित उतरवून ठेवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पाहणी करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.