Ravet : कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – ओव्हरटेक करताना भरधाव कारच्या (Ravet) धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.16) पुणे मुंबई बेंगलोर महामार्गावर रावेत येथे घडला.

याप्रकरणी रावेत पोलिसांनी गणपती शिवाजी पाटील (रा. तळेगाव दाभाडे) या कार चालकाला अटक केली आहे. मात्र या अपघातात मयत पावलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे त्यांच्या ताब्यातील (Ravet) कार भारधाव वेगाने चालवत असताना त्यांनी निष्काळाजीपणामुळे समोर असणाऱ्या कंटेनरला ओव्हरटेक केले. यावेळी तेथून पायी जाणाऱ्या पादाचाऱ्याला त्यांनी कारने जोरदार धक्का दिला.

Pimpri : लोकवस्तीमध्ये कचरा संकलन केंद्र नको, आमदार महेश लांडगे यांची आयुक्तांना सूचना

पादचारी खाली पडून जखमी झाला त्याला वायसीएम येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी संबंधित इसमास मयत घोषित केले. यावरून रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.