PCMC : कचरा सेवा शुल्काला स्थगिती नाहीच, 46 कोटी वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा सेवा (PCMC)शुल्क वसुलीच्या आदेशाला स्थगिती मिळाली नसल्याने महापालिकेकडून वसुली सुरुच आहे. 3 लाख 70 हजार 894 मालमत्ता धारकांनी 46 कोटी 67 लाखांच्या शुल्काचा भरणा केला आहे.

महापालिकेने 1 एप्रिल 2023 पासून वर्गीकृत कचरा सेवाशुल्क(PCMC) हे कर आकारणीच्या देयकांमधून वसुलीचा निर्णय घेतला. शहरात सहा लाख दोन हजार मालमत्ता आहेत. घरटी दरमहा 60 रुपये व व्यावसायिक आस्थापना असलेल्या मालमत्तांना आकारमानानुसार शुल्क आकारण्यात येत आहे.

Chinchwad : खबरदार! वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन कराल तर; पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक विभागाच्या कारवायांना वेग

पूर्वलक्षीप्रभावाने 2019 पासून 2023 पर्यंत चार वर्षांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यानुसार शुल्क वसुलीस सुरूवात केली मात्र, चार वर्षांचे शुल्क आकारण्यास शहरातील गृहिनिर्माण सोसायटी धारकांनी तीव्र विरोध केला.

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी लक्षवेधी सादर केली होती. या लक्षवेधीवर उत्तर देताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची सविस्तर बैठक घेण्यात येईल. त्यानंतर नियम व अटींची पडताळणी करुन याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत शुल्क वसुलीला स्थगिती देण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली मात्र, शुल्क वसुली स्थगितीचा आदेश महापालिकेला मिळाला नाही. परिणामी, शुल्काची वसुली सुरूच राहिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.