Alandi : ज्ञानोबा माऊली च्या जयघोषात अलंकापूरी मध्ये अनेक दिंड्यांचे आगमन

एमपीसी न्यूज -प्रभात समयी नभा मध्ये ढगाळ वातावरण,पवित्र इंद्रायणी (Alandi)मध्ये वारकरी भाविकांचे स्नान, शहरात सर्वत्र हरिनामाच्या कीर्तनाचा,परायणाचा सुमधूर ध्वनी तर इंद्रायणी घाटा वरती ,ठीक ठिकाणच्या रस्त्यावरती वारकऱ्यांच्या खांद्यावर भगवी पताका, महिलांच्या डोईवर तुळशी वृंदावन,विणेचा सुमधूर आवाज,टाळांचा लयबद्ध नाद ,मृदुंगाचा ताल,अनेक संतांच्या ,देवतांच्या पालखीचे शहरात आगमन व तोंडी ज्ञानोबा माऊली चा जयघोष,दर्शन रांगेतील वारकरी भाविकांना माउलींच्या संजीवन समाधी दर्शनाची आतुरता,माऊलींच्या समाधीचे दर्शन झाल्यावर अंत:करणात समाधान असे विलोभनिय दृश्य अलंकापुरी मध्ये दिसून येत आहे.

आळंदी मध्ये अनेक पायी दिंडीचे आगमन झाले (Alandi)आहे. इंद्रायणी घाट गर्दीने फुलू लागला आहे. वारकरी भाविक राहुट्या उभारून तसेच छोट्या मोठ्या धर्मशाळेत ,कार्यालयात आपल्या निवासाची सुविधा करत आहेत.

Kondhwa: आर्थिक वादातून नागरिकाचा खून, 12 तासात तीन आरोपींना बेड्या

उद्या दि.8 उत्पत्ती स्मार्त एकादशी , परवा दि.9 रोजी भागवत एकादशी व दि.11 संजीवन समाधी सोहळ्या निमित्त लाखो वारकरी भाविक आळंदी मध्ये दाखल होतील.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.