Chinchwad : खबरदार! वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन कराल तर; पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक विभागाच्या कारवायांना वेग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहतुकीच्या (Chinchwad)नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मोहीम वाहतूक शाखेने हाती घेतली आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तसेच वाहतुकीला शिस्त लावण्याच्या दृष्टीने या कारवाया केल्या जात आहेत.

 

वाहतुकीच्या नियामचे उल्लंघन कराल तर कारवाई अटळ आहे, अशा प्रकारचा सज्जड दम या कारवायांमधून वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांना दिला आहे.

वातुकीला शिस्त लागण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत(Chinchwad) राहण्यासाठी काही ठिकाणी नो पार्किंग जाहीर करण्यात आले आहे. नो पार्किंग जाहीर केलेल्या ठिकाणी नागरिक वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि इतर समस्या निर्माण होतात. मागील दीड महिन्याच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी13 हजार 694 वाहनांवर नो पार्किंगची कारवाई केली आहे.

Maharashtra: बालभारतीच्या सर्वेक्षणानुसार पुस्ताकातील कोरी पाने विद्यार्थ्यांना आवडली

दरम्यान, मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांवर देखील कारवाई झाल्याचे गुरुवारी (दि. 7) निदर्शनास आले. नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. मेट्रो स्थानक परिसरात वाहन तळ नसल्याने मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करावी लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.

भोसरी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक साळुंखे म्हणाले, मेट्रो स्थानक परिसरात पार्किंगची सुसज्ज व्यवस्था नाही. त्यामुळे काही प्रवासी रस्त्याच्या बाजूला मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करतात. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या आणि रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.”

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या नियोजन विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार म्हणाले, केवळ मेट्रो स्टेशन परिसरात कारवाई करावी, अशा प्रकारची कोणतीही मोहीम अद्याप सुरु नाही. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सर्व वाहतूक विभागांमध्ये सर्व प्रकारच्या कारवाया एकत्रितपणे सुरु आहेत. वाहतुकीला शिस्त लावण्याच्या दृष्टीने या कारवाया केल्या जात असून वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.