Vadgaon : माजी उपसरपंच एकनाथ गाडे यांचा आदर्श समाजसेवक पुरस्काराने गौरव
एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या वतीने जांभुळ गावचे (Vadgaon)माजी उपसरपंच एकनाथ विठ्ठलराव गाडे यांचा आदर्श समाजसेवक पुरस्काराने गौरव करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचा मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या वतीने विशेष सत्कार झाला.
जांभुळ येथे झालेल्या सत्कार समारंभाला संघटनेचे राज्य संघटक (Vadgaon)सोनबा गोपाळे गुरूजी, कार्याध्यक्ष सुभाष केदारी, सचिव प्रविण शिंदे, सहसचिव महेश कुडले, सचिन आवटे, संभाजी केदारी, सोमनाथ राक्षे, संतोष घारे, सचिन गरूड, नथुशेठ वाघमारे उपस्थित होते.
Alandi : ज्ञानोबा माऊली च्या जयघोषात अलंकापूरी मध्ये अनेक दिंड्यांचे आगमन
राज्य संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यांनी श्री गाडे यांच्या कार्यांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांचा मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.