PCMC : आता आरोग्य विभागप्रमुखांकडेच स्वच्छ अभियान समन्वयकपद

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) आरोग्य विभागाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे स्वच्छ भारत व महाराष्ट्र अभियान कक्षाचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या अंत्यसंस्काराला गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार

प्रशासन अधिकारी सोनल देशमुख यांची कल्याण-डोंबविली महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती झाल्याने त्यांना महापालिकेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे स्वच्छ अभियान कक्षाचे समन्वयक म्हणून जबाबदारी होती.

ती जबाबदारी आरोग्य विभागाचे प्रमुख असलेले सहाय्यक आयुक्त डांगे यांच्याकडेच सोपविण्यात आली आहे. या बाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी जारी केला (PCMC)  आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.