Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या अंत्यसंस्काराला गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी ( Pune) यांचे वयाच्या 82 व्या वर्षी आज पहाटे बंगळुरू येथे निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवार (25 जुलै) रोजी सकाळी पुण्यात  वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यावेळी गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.

 

Hinjawadi : आईच्या मागे गेला अन हरवला; हिंजवडी पोलिसांनी घडवली माय-लेकराची भेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी आज बंगळुरू येथे निधन झाले. मदनदास देवी यांचे पार्थिव उद्या सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी पुण्यातील मोती बाग येथील संघाच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

मदनदास देवी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी भाजपचे नेते गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक नेते मंडळी येणार ( Pune) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.