Ravet News : रावेत येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी महानगरपालिकडून रेल्वेला निधी

एमपीसी न्यूज : रावेत येथील शिंदे वस्ती येथे उड्डाणपूल बांधण्याच्या कामास अडथळा ठरणारे ईएचव्ही मोनोपोल (पायलॉन) व रेल्वेची विद्युत वाहिनी स्थलांतरित करावी लागणार आहे.(Ravet News) त्याकरिता रेल्वेला ब्लॉक घ्यावा लागणार आहे. या कामासाठी पालिकेने 94.39 लाख रुपये रेल्वेला देण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निगडीच्या भक्ती शक्ती चौक पासून ते किवळे येथील मुख्य चौकापर्यंतचा  बीआरटीएस मार्ग विकसित करीत आहे. यामुळे निगडी, आकुर्डी व आसपासच्या परिसरातील लोकांना पुणे  – मुंबई दृतगती मार्ग, मुंबई – बंगलूरू महामार्ग कडे व किवळेला लवकर पोहोचता येईल. तसेच रावेत, किवळे परिसरातील लोकांना पुणे- मुंबई महामार्ग, निगडी व इतर ठिकाणी लवकर पोहोचता येईल.

Dehu gaon : इंद्रायणी नदीतील अवैधरित्या वाळू उपसा प्रकरणी दोघांना अटक , ट्रॅक्टर व पोकलेन जप्त

या भक्ती शक्ती चौक पासून ते किवळे येथील मुख्य चौकापर्यंतचा बीआरटीएस मार्ग वर शिंदेवस्ती येथे उड्डाणपुल बांधण्याची काम अनेक वर्षांपासून रखडल्याने तो पूल अद्याप अर्धवट बांधण्यात आला आहे.

न्यायालयाच्या आदेशामुळे येथील उड्डाणपूलासाठी आवश्यक असलेली जागा पालिकेस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुलास अडथळा ठरणारे तेथील उच्चदाब विद्युत वाहकतारा (Nigdi News) व टॉवर हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच येथील रेल्वेच्या उच्च दाब विद्युत वाहिन्या स्थलांतरित करणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.