Chinchwad News : मित्राच्या नावे व्यावसायिकाची तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील व्यावसायीकाला मित्राला दिल्ली येथे पैशांची गरज असल्याचे भासवून  दिल्लीत पैसे देण्यास सांगितले. मात्र प्रत्यक्षात मित्राला पैशांची गरज नसून त्याने (Chinchwad News) कोणतीही मदत मागितली नसल्याचे समोर आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 23) दुपारी चिंचवड येथे घडली.

राजेंद्र सुरेश जैन (वय 56, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल जैन, संदीप जैन, दीपक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ravet News : रावेत येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी महानगरपालिकडून रेल्वेला निधी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मित्र अनिल जैन यांचा फोटो वापरून फोन करत फोनवर बोलणारी व्यक्ती हे अनिल जैन आहेत असे भासवले. अनिल जैन यांच्या नावाने बोलणाऱ्या व्यक्तीने दिल्लीमध्ये तीन लाख रुपयांची तात्काळ गरज आहे. फिर्यादींनी दिल्ली येथे पैशांची व्यवस्था केल्यास (Chinchwad News) त्यांना पुणे येथे कॅश आणून दिली जाईल, असे सांगितले. त्यामुळे फिर्यादींनी त्यांचा दिल्ली येथील मित्र शक्ती भाई यांच्याकडून आरोपीस पैसे दिले. आरोपींनी दिल्ली येथे पैसे घेतल्यानंतर ठरल्या प्रमाणे फिर्यादीस पुणे येथे पैसे न देता त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.