PCMC : सेवानिवृत्त प्रकरण निकाली काढण्यासाठी निवृत्त लेखापाल, उपलेखापालांना मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) सेवानिवृत्त प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी लेखा विभागाच्या पेन्शन कक्षासाठी महापालिकेमधून सेवानिवृत्त झालेल्या आणि इतर कामांची माहिती असलेल्या निवृत्त लेखापाल आणि उपलेखापाल अशा दोन कर्मचाऱ्यांची सहा महिने कालावधीसाठी मानधनावर नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार आहे.

पिंपरी -चिंचवड महापालिकेमध्ये सध्या कर्मचारी सेवानिवृत्त होण्याचे प्रमाण जास्त आहे. या सेवानिवृत्त होणाऱ्या तसेच मृत कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे तातडीने निकाली काढणे आवश्यक आहे. तथापि, लेखा विभागाकडील मर्यादित कर्मचारी संख्या विचारात घेता सेवानिवृत्ती वेतनप्रकरणे निकाली काढण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. कर्मचारी महासंघाच्या विविध मागण्यांबाबत महापालिकेने 5 ऑक्टोबर 2020  रोजी बैठक आयोजित केली होती.

Rbi Hike Repo Rate : रिझर्वह बॅंकेकडून नवीन रेपो दर जाहीर, कर्ज महागली

बैठकीतील सभावृत्तांतामध्ये जे महापालिकेचे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत आणि सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सेवानिवृत्तीच्या कामकाजाची ज्यांना माहिती आहे, अशा दोन कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता देय असलेल्या रकमा देण्याकरिता लेखा विभागाने मानधनावर स्वतंत्र नियुक्ती करावी, असे नमूद केले होते. ही बाब विचारात घेऊन सेवानिवृत्त प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी लेखा विभागाच्या पेन्शन कक्षासाठी महापालिकेमधून सेवानिवृत्त झालेल्या आणि इतर कामाची माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी सेवानिवृत्त लेखापाल वसंत शिंदे आणि उपलेखापाल बाजीराव ओंबळे या दोन कर्मचाऱ्यांची 18 ऑक्टोबर 2021  रोजी सहा महिने कालावधीकरिता नेमणूक केली होती. हा कालावधी संपुष्टात आला असून, अद्याप सेवानिवृत्ती प्रकरणांचे कामकाज पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सेवानिवृत्त लेखापाल वसंत शिंदे आणि उपलेखापाल बाजीराव ओंबळे यांची पुन्हा सहा महिने कालावधीकरिता मानधनावर नेमणूक (PCMC)  करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.