Pimpri: हातगाडीवरुन फळे, भाजीपाला विक्री करणा-यांवर कारवाईचा बडगा

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमध्ये हातगाडीवरुन भाजीपाला विक्री करण्यास मनाई असतानाही पिंपरीत भाजीपाला विक्री करणा-या 60 जणांचे गाडे महापालिकेने आज (बुधवारी) सकाळी जप्त केले आहेत. त्यांना भाजीपाला परत देण्यात आला असून हातगाडी जप्त केली आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी महापालिकेने भाजीमंडई बंद ठेवल्या आहेत. हातगाडीवरुन भाजीपाला, फळे विक्री करण्यास मनाई केली आहे. 3 मे पर्यंत हातगाडीवर भाजीपाला विक्रीस मनाई आहे. महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात शहरातील 46 ठिकाणी भाजीपाला फळे व विक्री सुरु केली आहे.

पिंपरीतील भाजीमंडई समोर हातगाडीवरुन भाजीपाला, फळे विक्री केली जात होती. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हातगाडे जप्त केले आहेत. जप्त केलेले 60 हातगाडे अण्णासाहेब मगर स्डेडियम येथे जमा केले आहेत. तर, वाकड, सांगवी भागात देखील हातगाड्यांवर भाजीपाला विक्री करणा-यांवर कारवाई केली आहे. त्यांचा भाजीपालाही जप्त केला आहे. हा भाजीपाला इस्कॉन संस्थेला दिला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.