World Update: जगातील कोरोनाबाधितांची संख्या 25 लाखांवर तर मृतांचा आकडा पावणेदोन लाखांच्या पुढे

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 25 लाख 57 हजार 181 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाख 77 हजार 641 (6.94 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 6 लाख 90 हजार 444 (27 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 16 लाख 89 हजार 096 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 16 लाख 31 हजार 851 (97 टक्के) रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 57 हजार 245 (3 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण 26 टक्क्यांवरून 27 टक्क्यांपर्यंत वाढले आहे तसेच सक्रिय रुग्णांमध्ये गंभीर अथवा चिंताजनक रुग्णांचे प्रमाण चार टक्क्यांवरून तीन टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे, ही बाब त्यातल्या त्यात दिलासादायक आहे. 

मागील पाच दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

17 एप्रिल – नवे रुग्ण 86 हजार 497      दिवसभरातील मृतांची संख्या 8 हजार 326

18 एप्रिल – नवे रुग्ण 81 हजार 906     दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 433

19 एप्रिल – नवे रुग्ण 75 हजार 804     दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 984

20 एप्रिल – नवे रुग्ण 73 हजार 931     दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 366

21 एप्रिल – नवे रुग्ण 75 हजार 254     दिवसभरातील मृतांची संख्या 7 हजार 062

कोरोनाबाधित टॉप 20 देशांच्या यादीतून ऑस्ट्रीया बाहेर गेला असून स्वीडनने 20 व्या स्थानावर आला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 8,18,744 (+25,985), मृत 45,318 (+2,804)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 2,04,178 (+3,968), मृत 21,282 (+430)
  3. इटली – कोरोनाबाधित 1,83,957 (+2,729), मृत 24,648 (+534)
  4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,58,050 (+2,667), मृत 20,796 (+531)
  5. जर्मनी – कोरोनाबाधित 1,48,453 (+1,388), मृत 5,086 (+224)
  6. यू. के. – कोरोनाबाधित 1,29,044 (+4,301), मृत 17,337 (+828)
  7. टर्की – कोरोनाबाधित 95,591 (+4,611), मृत 2,259 (+119)
  8. इराण – कोरोनाबाधित 84,802 (+1,297), मृत 5,297 (+88)
  9. चीन – कोरोनाबाधित 82,758 (+12), मृत 4,632 (+0)
  10. रशिया – कोरोनाबाधित 52,763 (+5,642), मृत 456 (+51)
  11. ब्राझील – कोरोनाबाधित 43,079 (+2,336), मृत 2,741 (+154)
  12. बेल्जियम – कोरोनाबाधित 40,956 (+973), मृत 5,998 (+170)
  13. कॅनडा – कोरोनाबाधित 38,422 (+1,593), मृत 1,834 (+144) 
  14. नेदरलँड – कोरोनाबाधित 34,134 (+729) , मृत 3,916 (+165)
  15. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 28,063 (+119), मृत 1,478 (+49)
  16. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 21,379 (+516), मृत 762 (+27)
  17.  भारत – कोरोनाबाधित 20,080 (+1,541) , मृत 645 (+53)
  18. पेरू –  कोरोनाबाधित 17,837 (+1,512) , मृत 484 (+39)   
  19. आयर्लंडकोरोनाबाधित 16,040 (+388) , मृत 730 (+43)
  20. स्वीडन – कोरोनाबाधित 15,322 (+545), मृत 1,765 (+185 )       

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.