PCMC : अर्बन स्ट्रीट! 5 रस्ते आणि 200 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे-मुंबई महामार्गासह (PCMC ) शहरातील 5 रस्त्यांवर महापालिका अर्बन स्ट्रीट अंतर्गत 8 फुटांचे पदपथ विकसित करणार आहे. त्यावर 200 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली महापालिका उधळपट्टी करत असल्याची टीका होऊ लागली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची संख्या वाढत असताना रस्ते मात्र अरूंद केले जात आहेत. पुणे-मुंबई महामार्ग, टेल्को रोड ते बालाजीनगर, पवना ब्रिज ते डांगे चौक, डांगे चौक ते भूमकर चौक, आणि शिवार चौक ते गोविंद गार्डन हॉटेल या पाच रस्त्यांवर अर्बन स्ट्रीट अंतर्गत पदपथ विकसित आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहेत.

पुणे-मुंबई महामार्ग बीआरटीमुळे अरुंद झाला आहे. पायी चालणाऱ्यांची संख्या वाहनांच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. रस्ते अर्बन स्ट्रीट नुसार विकसित झाल्यानंतर रस्त्याची रुंदी कमी होणार आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होणार यात शंका नाही.

Nigdi : एस. बी. पाटील यांचे कार्य नवी दिशा देणारे – ज्ञानेश्वर लांडगे

महापालिकेने आजपर्यंत पदपथ व सायकल (PCMC ) मार्गावर कोटयावधी रुपयांचा खर्च केला आहे. त्यामध्ये दापोडी ते पिंपरी (दोन्ही बाजू)- 109 कोटी, पिंपरी ते निगडी (एक बाजू)- 60 कोटी, निगडी ते पिंपरी (एक बाजू)- 60 कोटी, टेल्को रोड-लांडेवाडी ते थरमॅक्स चौक – 160 कोटी, बिर्ला रुग्णालय ते डांगे चौक- 19 कोटी, डांगे चौक ते कस्तुरी चौक- 15 कोटी, शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक- 55 कोटी आणि सांगवी ते किवळे- 90 कोटी रुपये खर्च केले आहेत. आता पाच रस्त्यावर 200 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.