Extortion case : फोनवरून खंडणी मागणारा 24 तासाच्या आत गजाआड

एमपीसी न्यूज – व्हाट्सअप मॅसेज वरून 10 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक व गुन्हे शाखा चार यांनी 24 तासाच्या आत गजाआड केले आहे.

गणेशकुमार मुन्शी महतो (वय 20 रा. सध्या निघोज बेंडाळे वस्ती ता. खेड. जि. पुणे, मुळगाव- सलग, सायाळ, हजारीबाग झारखंड) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालिदास बबन शिंदे (वय 36 रा. खालुंब्रे, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्नुसार आरोपीने 13 नोव्हेंबर रोजी शिंदे यांना व्हॉटसअप मॅसेज करून तुला व तुझ्या कुटुंबाला मारून टाकीन, पोकलेन चे मशीन जाळून टाकीन, हे नको असेल तर मला 10 लाख रुपये दे, अशी खंडणी मागितली होती.

Pimpri News: चाकण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैधरित्या चालणारे गावठी हातभट्टीवर कारवाई करून एकूण 23.75 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट

या तक्रारीचा तपास करत गुन्हे शाखा युनिट 4 चे पोलीस उप निरीक्षक रायकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक औटी व खंडणी विरोधी पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक दुधावणे, पोलीस हवालदार कानगुडे, काळे, काटकर, पोलीस नाईक बोटके, मगर ,पोलीस अंमलदा गायकवाड, डोळस यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड(अतिरिक्त कार्यभार) खंडणी विरोधी पथक गुन्हे मच्छिंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपास सुरु केला. यावेळी काटकर यांना बातमीदार द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, मॅसेज करणारा इसम निष्पन्न झाला असून तो बेंडाळे येथील अतिथी हॉटेल जवळ थांबला आहे.पोलिसांनी तेथे जात त्याला शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी गुन्हा केल्याचे कबूल केले . त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला माबोईल जप्त केला.याचा पुढील तपास महाळुंगे पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.