Phugewadi: थकित वेतनासाठी महामेट्रोच्या कामगारांचे पुन्हा मंगळवारी आंदोलन

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची माहिती; मेट्रोने थकीत वेतन 30 जूनलाच देण्याचे दिले होते आश्वासन

एमपीसी न्यूज – थकित वेतन मिळावे, या मागणीसाठी महामेट्रोचे कामगार उद्या (मंगळवारी) आंदोलन करणार आहेत. महामेट्रोच्या फुगेवाडी येथील कार्यालयासमोर सकाळी साडेअकरा वाजता आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिली.

महामेट्रोचे काम करणा-या एचसीसी अफ्रा इन्फ्रा प्रोजेक्टने कामगारांचे वेतन थकविले आहे. डिंसेबर 2018 पासून संबंधित कामगारांचे वेतन थकवले आहे. त्याबाबत कामगारांनी सातत्याते आवाज उठविला, आंदोलन केले. मात्र, या कंपनीनेचे संचालक वारंवार शब्द फिरवित आहेत. त्याबाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत यांच्याकडे ही समस्या मांडली. त्यावर दिक्षीत यांनी 20 जूनपर्यंत कंपनीला कामगारांची यादी महामेट्रोला देण्यात यावी. 30 जूनपर्यंत सर्व कामगारांचे थकीत सर्व वेतन अदा करावे. जर नाही केले तर संबंधित कंपनीच्या बँकगँरटीमधून अदा केले, जाईल असे कंपनी व्यवस्थापकाला सांगितले आहे.

  • दरम्यानच्या काळात एचसीसी अफ्रा इन्फ्रा प्रोजेक्टचे व्यवस्थापकीय संचालक अनिल बिराजदार यांनी काही कामगारांचे थकीत वेतन 20 जून रोजी अदा केले. मात्र, 30 जूनपर्यंत उर्वरीत सर्व थकीत वेतन कंपनी अदा करु शकणार नाही, अशी भूमिका कंपनीने घेतली. कामगार वेगवेगळ्या राज्यातील असल्यामुळे त्यांना वारंवार हेलपाटे मारणे शक्य नाही. सर्व कामगारांचे थकीत वेतन 30 जुलैला अदा करण्याबाबत महामेट्रोशी पत्रव्यवहार केला. त्यानुसार कामगारांचे थकीत सर्व वेतन 30 जूनलाच देण्याचे आश्वासन मेट्रोने दिले होते.

तथापि, 30 जूनपासून आजपर्यंत कामगारांच्या उर्वरित थकीत वेतनाची दमडीही मिळाली नाही. महामेट्रोने शब्द पाळला नाही. त्यामुळे मंगळवारी फुगेवाडी येथील महामेट्रो रेल पुणे कार्यालयात पुन्हा आंदोलन केले जाणार आहे, असे भापकर यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.