Pimpri: मुसळधार पावसाने शहराला झोडपले; जनजीवन विस्कळीत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर परिसरात आज दिवसभर मुसळधार पाऊस झाला. दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. आज दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने शहरातील नाले, गटर्स ओसंडून वाहत होते.

संततधार पावसामुळे चिंचवड परिसरातील बंद अवस्थेत असलेल्या एका कंपनीची भिंत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. गणेशनगर येथील ताडपत्री बनविण्याची कंपनी बंद आहे. परंतु, कंपनीच्या देखभालीसाठी याठिकाणी सुरक्षारक्षक तैनात आहेत.

  • संततधार पावसामुळे आज कंपनीच्या परिसरातील दोन ठिकाणी सिमाभिंत कोसळली आहे. सुमारे 400 ते 500 फूट लांबीची व आठ फूट उंचीची सिमाभिंती अनेक ठिकाणी कमकुवत होऊन रस्त्याच्या बाजूने ढासळली आहे. कोसळलेल्या सिमाभिंतीमुळे सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. तर, फुगेवाडी येथील पठाण चाळीतील घरात भुयारी चेंबर्सचे पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल झाले. डेअरी पिंपळे सौदागर डेअरी फार्म येथे एक झाड पडल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, खडकी, बोपडी परिसरात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी साडेदहा वाजता खडकी दर्जिगल्ली व कसाई मोहल्ला येथील घरांच्या भिंती कोसळल्या. सुदैवाने या घटनेत कुठलीच जीवितहानी झाली नाही.

  • महादेववाडी साईबाबा मंदिर परिसरातील एक जुना वृक्ष सिमा भिंतीवर कोसळला. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील नेहरु उद्यान तसेच किर्लोस्कर कंपनी समोर काही झाडांच्या फांद्या कोसळल्यामुळे वाहतूककोंडी निर्माण झाली होती. बोपोडीत मुंबई-पुणे रस्त्यालगत आगरवाल धर्म शाळेशेजारील एका धोकादायक इमारतीतील काही भिंतीना तडा जाऊन काही भाग ढासळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.