BNR-HDR-TOP-Mobile

Pimple gurav : शिक्षकदिनानिमित्त मराठवाडा जनविकास संघातर्फे शिक्षकांचे सत्कार

एमपीसी न्यूज – शिक्षकदिनाचे औचित्य साधून मराठवाडा जनविकास संघातर्फे शिक्षकांचा भारतीय संविधानाच्या पुस्तकाची प्रत व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.

प्रथम सर्व महिला शिक्षकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड परिसरातील 50 शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार आणि सद्स्य यांचे हस्ते या सर्व शिक्षकांचा सन्मान भारतीय संविधानाच्या पुस्तकाची प्रत व तुळशीचे रोप देऊन करण्यात आला.

अरूण पवार म्हणाले की, राष्ट्रउभारणीमध्ये शिक्षकांचे योगदान मोठे आहे. सुजाण व सुसंस्कारी नागरिक बनविण्याचे काम शिक्षकच करत असतात. म्हणूनच अशा प्रकारचे सत्कार शिक्षकांना एक नवी ऊर्जा देतात.

प्रा. संपत गर्जे , बाळासाहेब काकडे, वामन भरगंडे, मिलिंद संधान, सौ. सुनीता काळे, प्रल्हाद झरांडे या शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संपत गर्जे यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन सूर्यकांत कुरूळकर यांनी केले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3