Pimple Nilakh: ‘निमा’ संस्थेच्या स्नेहसंमेलनात गायनसह नृत्यांचेही सादरीकरण

एमपीसी न्यूज – नॅशनल इंटीग्रेडेट मेडिकल असोसिएशन (निमा) या संस्थेचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. यामध्ये डॉक्‍टरांच्या कुटुंबियांनी सहभाग घेत गायन आणि नृत्य सादर केले. हा सोहळा सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहामध्ये पार पडला.

यावेळी अकोले तालुक्‍याचे आमदार डॉ. किरण लहामटे, डी वाय पाटील रुग्णालय व रिसर्च सेंटरचे डॉ. यशराज पाटील व निमा सेंट्रलचे अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर आदी उपस्थित होते. डॉक्‍टरांना रोजच्या रुग्णसेवेच्या कार्यातून थोडासा विरंगुळा मिळावा, यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते.

यंदा स्नेहसंमेलन सोहळ्याला “निमानुबंध’ असे नाव देण्यात आले होते. अनेक डॉक्‍टर व त्यांच्या कुटुंबियांनी याचा आनंद घेतला. लहान मुलांच्या नृत्यांमध्ये आर्नव निघोजकरचे नृत्य, समूह नृत्यामध्ये छबीदार छबी, दबंग, स्त्रीशक्तीचा जागर ही नृत्ये व सांगवी डॉक्‍टर असोसिएशनच्या वतीने सादर केलेली “डॉक्‍टरांवर होणारे हल्ले व संघटना’ या संदर्भात एक नाटिका लक्षवेधी ठरली.

गायनामध्ये डॉ. प्रदीप खेडकर, डॉ. नीलेश वाघमारे, डॉ. रोहिणी काळे, डॉ. प्रशांत गादिया, डॉ. चान सिंग पवार यांनी उत्कृष्ठ संगीत सादर केले. याप्रसंगी दहावी ते बारावीमध्ये विशेष गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. विजयी उपासनी, डॉ. सुधीर काळे, डॉ. नारायण खुळे, डॉ. नीलेश लोंढे, डॉ. चंद्रकांत राऊत, डॉ. सूर्यकांत भिसे, डॉ. संदीप मेंगडे, डॉ. महेश निघोजकर, डॉ. संतोष भांडवलकर, डॉ. मकरंद कुलकर्णी, डॉ. महेश पाटील यांचा यांचा सत्कार करण्यात आला. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यजीत पाटील, सचिव डॉ. अभय तांबिले, खजिनदार डॉ. सुनील पाटील यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.