Pimple Nilakh : पिंपळे निलख येथे खोली समोरच पिकवला गांजा, 12 किलो गांजासह एकाला अटक

एमपीसी न्यूज – पिंपळे निलख येथे (Pimple Nilakh) शाळेतील खोली समोरच एकाने तब्बल 12 किलो 462 ग्राम वजनाचा गांजा पिकवला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी(दि.4) पिंपळे निलख येथील वाकवस्तीतील एका चाळीत करण्यात आली.

पोलिसांनी धानेश अनिरुद्ध शर्मा (वय 34 रा पिंपळे निलख) याला अटक केली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई मितेश यादव यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा हा वाकवस्तीतील विक्रांत टकले यांच्या चाळीत राहत होता. त्याने त्याच्या खोली समोर असलेल्या मोकळ्या जागेतच हा गांजा पेरला होता. यातून बारा किलो 462 ग्राम वजनाची दोन गांजाचे झाडे अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केली आहेत.

Podcast : पुणे बिझनेस स्कूलच्या सहयोगाने कृषी क्षेत्राचा आढावा घेणारी मुलाखत नक्की ऐका

या गांजाची किंमत तब्बल एक लाख 96 हजार 930 रुपये एवढी आहे. आरोपीला पोलिसांनी मोबाईल सह अटक केली आहे. (Pimple Nilakh) सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.