Pimple Saudagar : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक

Fraud Case

एमपीसी न्यूज : – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष (Pimple Saudagar) दाखवून एका व्यक्तीकडून बँक खात्यावर वेळोवेळी 20 लाख 60 हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 12 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडला.

Allianz Global Investors, UK कंपनी, कंपनी प्रतिनिधी विनोद कावले, प्रोफेसर अर्जुन कपूर आणि मीना पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 46 वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : शरद पवार यांच्या बारामती निवडणूक जिंकण्याला 57 वर्षे पूर्ण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आरोपी विनोद याच्यासोबत सोशल मिडियावरून ओळख झाली. ओळखीतून त्यांच्यात शेअर मार्केट बद्दल बोलणे झाले. त्यानंतर विनोद याने अर्जुन कपूर आणि मीना पटेल यांच्याशी फिर्यादी यांची ओळख करून दिली.

त्यानंतर त्यांना शेअर मार्केट बद्दल माहिती सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांनी गुंतवणूक (Pimple Saudagar) केलेली रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला असता विविध कारणांसाठी आणखी रक्कम घेत त्यांची 20 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share