Pune : शरद पवार यांच्या बारामती निवडणूक जिंकण्याला 57 वर्षे पूर्ण

एमपीसी न्यूज – कसलीही पार्श्वभूमी नसताना (Pune) एक तरुण निवडणूक लढविण्याचा निश्चय करतो. गावागावात त्याची चर्चा होते. बघता बघता लोकंच ती निवडणूक हातात घेतात आणि तो तरुण मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पोहोचतो. त्या मतदारसंघाचे नाव बारामती आणि तो तरुण म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब…! त्यांनी पहिली निवडणूक जिंकली त्याला आज 57 वर्षे पूर्ण झाली. आपण सर्वांनी आदरणीय पवार साहेबांना दिलेली साथ आणि त्यांच्यावर केलेलं प्रेम खुप मोलाचे आहे. हे प्रेम कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपले प्रेम, विश्वास आणि साथ याबद्दल आपणा सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर आठवणींना उजाळा दिला आहे.

आगामी बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुळे यांच्या पोस्टला महत्त्व प्राप्त झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे.

Pune: मेडी – आयकॉन पुरस्कार सोहळा आणि महिला डॉक्टरांची मेडिक्वीन सौंदर्यवती स्पर्धा 25 फेब्रुवारीला पुण्यात रंगणार 

त्यामुळे आपण देऊ त्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. तर, दुसरीकडे शरद पवार यांनीही पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा इशारा दिला आहे. खासदार सुळे यांना 2024 ची निवडणूक जड (Pune) जाणार असल्याचे बोलले जात आहे. कारण या निवडणुकीत खुद्द अजित पवारच उमेदवार देणार आहे. भाजपने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडल्याची कुजबुज सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.