Pimple Saudgar : 15 फूट रस्ता खचल्यानंतर पालिकेला जाग, आता उचलले ‘हे’ पाऊल

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील रहदारीच्या परिसरात (Pimple Saudagar) सुरु असलेल्या बांधकाम इमारतीच्या पायामुळे 15 फूट रस्ता खचल्यानंतर पालिकेने आता कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. रस्त्याला लागून कोणी बांधकाम इमारतीसाठी पाया खोदत असेल. तर, त्यांना नोटीस दिल्या जाणार आहेत. तसेच पिंपळे सौदागर येथील बिल्डरला देखील नोटीस देण्यात आली आहे.

पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन येथील रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरु होते. बिल्डरने इमारतीचे बांधकाम करताना सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या नव्हत्या. निकृष्ट दर्जाचे पायलिंग केले. त्यामुळे महापालिकेचा 15 फूट रस्ता खचला होता. शाळांच्या परिसरात, ऐन रहदारीचा मोठा रस्ता खचल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी ही घटना घडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

बिल्डरला नोटीस –

महापालिकेने बांधकाम व्यावसायिक घनश्याम सुखवानी, संजय रामचंदानी यांना नोटीस बजाविली आहे. पायाचे खोदकाम करताना जमीन लेवलपर्यंत पाइल पद्धतीने केलेली 60 मीटर लांबीची संरक्षक भिंत ढासळून रस्ता खचला. त्यामुळे पाण्याची पाईपलाईन, स्टॉर्म वॉटर वाहिनी, ड्रेनेज लाईन, वीजवाहिनी तुटली आहे. यामुळे लोकांच्या संरक्षणास बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे बांधकाम तत्काळ बंद करावे.

नकाशाप्रमाणे सीमाभिंत बांधवी. स्ट्रॉम वॉटर वाहिनी, पाण्याची पाईपलाईन, इतर सेवावाहिन्या दुरुस्त करुन रस्ता पूर्ववत वाहतुकीस उपलब्ध करुन द्यावा. काम पूर्ण केल्याचा लेखी अहवाल महापालिकेला द्यावा. काम (Pimple Saudagar) पूर्ण होईपर्यंत बांधकाम परवानगीस स्थगिती देण्यात आल्याची नोटीस शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली आहे.

Alandi : आळंदीमध्ये डोळे येण्याची साथ

पोलिसांत तक्रार –

पिण्याचे पाणी, पावसाळी पाण्याची जलवाहिनी तुटल्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विकासकावर कारवाई करण्याबाबत महापालिकेचे उपअभियंता विनायक माने यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

भविष्यात दुर्घटना होवू नये यासाठी नोटीसा –

शहरात रस्त्याच्या कडेला इमारतीचे बांधकाम सुरु असल्यास दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. रस्त्याला लागून कोणी बांधकाम इमारतीसाठी पाया खोदत असेल. तर, त्यांना काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. विकसकांना दक्षता घेण्याबाबत नोटीस देण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांना दिल्याचे सह शहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.