Alandi : आळंदी येथे हरिपाठाचा पेनड्राईव्ह लोकार्पण सोहळा

ओळख श्री ज्ञानेश्वरीची' उपक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

एमपीसी न्यूज – एक चांगला व आदर्श विद्यार्थी घडविण्याचा उद्दात हेतू उराशी बाळगून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ एक संस्कारक्षम उपक्रमाचे आयोजन आळंदी (Alandi) मध्ये करण्यात आले.

Alandi : आळंदीमध्ये डोळे येण्याची साथ

त्याच उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचा दि.21 रोजी शुभारंभ लेखक वक्ते व कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच दैनिक प्रभातचे उपसंपादक श्रीकृष्ण पादीर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

 

त्याचबरोबर द्वितीय वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजी आमदार वडगाव शेरी विधानसभा बापूसाहेब पठारे यांच्या शुभहस्ते झाला. त्यामध्ये पहिल्या दोन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पुणे महानगरपालिकाचे नगरसेवक योगेश मुळीक यांच्या वतीने साईकल, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना कै.ज्ञानेश्वर हरपळे यांच्या स्मरणार्थ मुलगी प्राजक्ता हरपळे यांच्या वतीने एक वर्षाचा पूर्ण शैक्षणिक खर्च (वह्या, पुस्तके, दोन शालेय गणवेश, शालेय फी सह) दिला.

 

पाचव्या व सहाव्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रकाश काळे यांच्या वतीने शालेय गणवेश, सात ते अठरा क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सोपान काळे यांच्या वतीने शालेय बॅग तसेच सात ते दहा क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना श्रीधर घुंडरे यांच्यावतीने सार्थ ज्ञानेश्वरी व 11 ते 18 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना हेमांगी कारस्कर यांच्या वतीने टिफिन डब्बा देऊन सन्मानित करण्यात आले.

 

तदनंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थान, पुणेचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते ह. भ. प. सुभाष महाराज गेठे यांनी निरूपण केलेल्या हरिपाठाच्या पेनड्राईव्हचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

 

याप्रसंगी स्व. गुलाबराव गोरे प्रतिष्ठान चाकणचे विकास गोरे, आदर्श सरपंच व अध्यक्ष बापदेव शिक्षण संस्था, रासेचे विजय शिंदे, स्वामी विवेकानंद विद्या विकास प्र. सं. खरपुडीचे अध्यक्ष बापूसाहेब चौधरी, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, आळंदी शहर पत्रकार संघाचे प्रमुख अर्जुन मेदनकर, ‘

ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ पाठाचे अध्यापक ह. भ. प. सुभाष महाराज गेठे, ह. भ. प. भागवत महाराज साळुंखे, ह. भ. प. उमेश महाराज बागडे, ह. भ. प. श्रीधर घुंडरे, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे सचिव विश्वंभर पाटील, सदस्य सोपान काळे, धनाजी काळे, प्राजक्ता हरपळे, विलास वाघमारे, तुकाराम गवारी, नरहरी चौधरी, निर्मलाताई चव्हाण, संगीता पाटील, सोपान दाभाडे, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, राज्यातील विविध संस्था व शाळा यांचे अध्यक्ष, सचिव, प्रतिनिधी, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सर्व विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थी व पालक, नवीन वर्गाचे विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रकाश काळे यांनी योग्य वयात योग्य संस्कार व शिक्षण देणे काळाची गरज असून श्रद्धेने केलेले कोणतेही कार्य कधीही विफल जात नाही असे सांगितले.

 

तसेच ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांत होणारे सकारात्मक अमुलाग्र बदल पाहून मनस्वी झालेला आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर या उपक्रमासाठी चरित्र समितीच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली व दरवर्षी राज्यात ज्या शाळा हा उपक्रम चालवतील त्यातील उत्कृष्ट उपक्रम चालवणाऱ्या दहा शाळांना प्रत्येकी दहा हजार रुपये बक्षीस जाहीर केले.

 

त्यानंतर विद्यार्थी मनोगतातून विवेक विठ्ठलदास गुट्टे याने ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमामुळे स्वतःमध्ये व अध्ययन प्रक्रियेमध्ये झालेले सकारात्मक बदल व्यक्त केले. नंतर अजित वडगावकर यांनी इतर शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करत या उपक्रमासाठी संस्थेच्या वतीने पाच लाखाची मदत जाहीर केली.

 

तदनंतर बापूसाहेब पठारे यांनी बापू पठारे -वडगावकर कुटुंबीय व संचालक शिक्षण संस्था यशस्वीरित्या चालवित असल्याचे कौतुक केले तसेच उपक्रम चालवणाऱ्या संस्था व चरित्र समितीचे कौतुक करत गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याच्या उद्देशाने ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या संस्कारक्षम उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाचे शिक्षण देण्याचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

 

श्रीकृष्ण पादीर यांनी ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते या उक्तीनुसार ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमाद्वारे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे ज्ञान  विचार  विविध घटकांच्या व माध्यमातून समाजात पसरविण्याचे कार्य करावे असे सांगितले.

 

अध्यापकांच्या वतीने सुभाष महाराज गेठे यांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी निस्वार्थ भावनेने सेवा व सहकार्य देणाऱ्या श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व पालक आदींचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच ग्रंथातील ज्ञान हे फक्त ऐकण्यासाठी नसून त्यातील विचार कृतीत आणले तरच जीवन सार्थक होईल असेही सांगितले.

 

नंतर महेश सूर्यवंशी यांनी या उपक्रमासाठी लागेल ते योगदान व सहकार्य करण्याच्या आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी मिलिंद जोशी यांनी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या संस्कारक्षम उपक्रमाचे व हा उपक्रम यशस्वीरित्या चालविण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला अशा श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान व आळंदी शहर पत्रकार संघ यांचे कौतुक केले.

माऊलींच्या साहित्याची महत्ती सांगत माऊलींच्या व त्यांच्या साहित्याच्या सानिध्यात राहणे आपल्या सर्वांचे भाग्य असून या सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जोडीला तत्वज्ञानाची सांगड घालून हे तत्त्वज्ञान जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणे हे आपल्या सर्वांची जिम्मेदारी असल्याचे सांगितले. तसेच कर्तुत्वाचे उत्तुंग हिमालय नवीन पिढीला दाखविण्याची जबाबदारी ही वरिष्ठांची असल्याचे सांगत साहित्यातील सकारात्मक ऊर्जेची शक्ती विद्यार्थ्यांना द्यावी असे विचार व्यक्त करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व उपस्थितांचे आभार प्राचार्य दीपक मुंगसे यांनी व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.