Pune : जेजूरीतील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम चौथ्यांदा रद्द

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील (Pune) पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे 23 जुलै रोजी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम होणार होता. पण, हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे प्रशासनाला तो कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. त्यामुळे शासन आपल्या दारी चौथ्यांदा रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

राज्यातील अनेक भागात शासन आपल्या दारी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून पुणे जिल्हय़ातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे याच महिन्यात तब्बल तीन वेळ नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्या त्या वेळेच्या राजकीय घडामोडीमुळे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली होती.

Alandi : आळंदी येथे हरिपाठाचा पेनड्राईव्ह लोकार्पण सोहळा

पण, आता पुणे जिल्हयात शुक्रवार, शनिवारी रेड अलर्ट आणि पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट असा इशारा हवामान (Pune) विभागाने दिला आहे. त्यामुळे जेजुरी येथे 23 जुलै रोजी होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

तसेच जिल्ह्याच्या घाट क्षेत्रातील पावसाची स्थिती आणि पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज लक्षात घेऊन लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळापर्यंत येण्यास कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.