Alandi : आळंदीमध्ये डोळे येण्याची साथ

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) देवाची परिसरात मुला-मुलींचे डोळे येण्याची साथ पसरली आहे. आळंदी रुग्णालयात सोमवारी  डोळे येणे या साथीची मुले आली. व ती वाढत राहिली. हा प्रकार साथीचा असल्याने वैद्यकीय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी (सिव्हिल सर्जन )वरीष्ठ आधिकारी यांना फोनद्वारे माहिती कळवली. त्यांनी संबंधित उपचारासाठी डॉक्टर्स, औषधे पाठवली.

Alandi : हनुमानवाडीतील प्राथमिक शाळेत आढळली घोरपड

मंगळवारी डोळे येणे याचे 740 रुग्ण आढळले. वाढता आकडा पाहून शिक्षणाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला. संबंधीत साथीविषयी माहिती दिली. ही साथ अति संसर्गजन्य असल्याने डोळे आलेल्या मुलांना घरी पाठवा. बरे झाल्याशिवाय शाळे मध्ये येऊ नका. अश्या सूचना शिक्षकांना द्याव्यात असे पत्र दिले. आळंदी  पालिकेला माहिती पत्राद्वारे देण्यात आली.

 

रुग्णालयात त्या  साथीचे रुग्ण जास्त प्रमाणात येत असल्याने सिव्हिल सर्जन यांना माहिती देण्यात आली. तसेच ही मुले रुग्णालयात आलेली आहे. मुले शाळेत ही जातात. त्यामुळे शाळा तपासणी करणे गरजेचे आहे. टीम पाठवून द्यावी अशी मागणी डॉ.उर्मिला शिंदे यांनी केली.

 

आळंदी (Alandi) शहरातील शाळेमध्ये जाऊन मुलांच्या तपासण्या होत आहेत. तिथे उपचार मेडिसिन दिले जात आहेत. डोळे आलेल्या मुलांची वेगळी (रांग) कक्ष करत , इतरांना त्यामध्ये मिसळून देऊ नका. डोळे आलेल्या मुलांना बरे झाल्या शाळेत शिवाय येऊ नका. अश्या सूचना करण्यात येत आहेत.

 

सोमवारी 450, मंगळवार 740,बुधवार 210 , गुरुवार 160 , शुक्रवारी दुपार पर्यँत 170 असे डोळे येणे साथीच्या मुलांची आकडेवारी आहे. 5 टीम सध्या कार्यरत असून शहरातील संस्था तपासणीसाठी अजून 4 टीम  आळंदी येणार आहेत. याबाबत माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी दिली. आळंदीमध्ये खेड तालुका आरोग्य आधिकारी डॉ. इंदिरा पारखे या ही कार्यरत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.