Pimple Saudagar News : जमिनीचा बळजबरीने घेतला ताबा, दुकान बांधून दुसऱ्याला दिले भाड्याने

एमपीसी न्यूज – जमिनीचा बळजबरीने ताबा घेऊन त्या जागेवर दुकान बांधून ते दुकाने दुस-याला भाड्याने देऊन फसवणूक  केल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे सौदागर येथे 15 फेब्रुवारी 2018 ते 1 एप्रिल 2022 या कालावधीत ही घटना घडली.

याबाबत नरेश ठाकुरदास वाधवानी (वय 55, रा. पिंपरी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय. त्यावरून खेमचंद उत्तमचंद भोजवानी (वय 58, रा. वाकड), कन्हैयालाल होतचंद मतानी (वय 63, रा. पिंपरी), गणेश नानासाहेब गायकवाड (रा. औंध) आणि इतर 25 जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खेमचंद, कन्हैयालाल व गणेश या तिघांनी फिर्यादी नरेश वाधवानी यांच्या जमिनीचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला. आरोपींनी त्या जागेवर बेकायदेशीर शेड मारून दुकान बांधले. ते दुकान भाड्याने देऊन बेकायदेशीरपणे भाडे स्विकारून आर्थिक फसवणूक केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.