Pimple Saudagar News: भाजपा महिला मोर्चाच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी कुंदा भिसे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा महिला मोर्चाची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. चिंचवड विधानसभा मतदारसंघात कुंदा भिसे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहराच्या सरचिटणीस म्हणून कुंदा भिसे व सोनम मोरे यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष म्हणून सरिता नेवाळे व रंजना चिंचवडे, कोषाध्यक्ष म्हणून अस्मिता भालेकर, चिटणीस म्हणून निकिता गोसावी, ओबीसी महिला आघाडी अध्यक्षपदी सारिका पवार, सांस्कृतिक महिला आघाडी अध्यक्ष नंदा फुगे यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी महापौर माई ढोरे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गावडे,संघटन सरचिटणीस अमोल थोरात , युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, जिल्हा सरचिटणीस राजू दुर्गे, विजय फुगे, पवना बँकचे उपाध्यक्ष जयनाथ काटे हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.