Pimple Saudagar News: आमदार जगतापांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बचा हल्ला

एमपीसी न्यूज – चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला आहे. ही घटना आज (मंगळवारी, दि. 23) दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. पिंपळे सौदागर येथे त्यांचे कार्यालय आहे. अज्ञातांनी मंगळवारी दुपारी कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकला. मात्र, हा बॉम्ब कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीवर पडला.

सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.