Pimple Saudagar : पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल मध्ये बालदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज –  व्ही एच बी पी पांडुरंग काटे प्रतिष्ठाण  संचालित पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल मध्ये बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला .
_MPC_DIR_MPU_II
बाल दिन हा  बालकांसाठी  खास विशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (१४ नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. बाल दिनानिमित्त खास लहान मुलांच्या सहभागावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या चित्रकला , गायन , नृत्य  स्पर्धा घेण्यात आल्या .
या दिवशी शाळेच्या मुख्य द्वारावर मुलांना आवडणा-या  कार्टूनचे मास्क घालून व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले . शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . शाळेतील विद्यार्थांनी चाचा नेहरूंबद्दल आपले विचार त्यांच्या चिमुकल्या शब्दात व्यक्त केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर , पर्यवेक्षिका संगीता पराळे  आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कीर्ती कान्हेरे यांनी तर आभार प्रदर्शन सुप्रिया कोमपेल्ली यांनी केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.