Nigdi : ‘बालदिन’निमित्त मॉडर्नची विमान सफर; उपक्रमात 50 विद्यार्थी सहभागी

एमपीसी न्यूज – भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय बालदिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. या बालदिनाचे औचित्य साधून यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुलच्या विद्यार्थ्यासाठी विमान सहलीचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमात शाळेतील ५० विद्यार्थी सहभागी झाले आहे.

यावेळी शाळेतील मयुरेश देशिंगे या विद्यार्थ्यांचा वाढदिवस विमान कंपनीची परवानगी घेऊन विमानात साजरा करण्यात आला.तो क्षण विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय क्षण ठरला, त्याबद्दल त्याच्या पालकांनीही आनंद व्यक्त केला.या उपक्रमासाठी सहल प्रमुख शिवाजी अंबिके ,गंगाधर सोनवणे ,प्रशांत कुलकर्णी,आशा कुंजीर ,मनीषा बोत्रे यांनी नियोजन केले.संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे , सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे , उपकार्यवाह शरद इनामदार ,प्राचार्य सतीश गवळी यांनी मार्गदर्शन केले.

_MPC_DIR_MPU_II

विमानातून प्रवास करण्याचा आनंद लुटण्याबरोबर इतिहासाची माहिती व्हावी, या हेतूने हैद्राबाद येथे भेट देण्यात आली.विमानातून आकाशात झेप घेतल्यावर जमिनीवरील घरे ,वाहने , डोंगर ,अनेक मोठ्या वस्तू अतिशय लहान दिसतात याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. तर ढगांच्याही वर गेल्यावर दिसणारे विलोभनीय दृश्य पाहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.

या विमान सहलीत विद्यार्थ्यांनी हैद्राबाद येथील गोवळकोंडा किल्ला, चारमिनार अशा ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिली.यातून त्या काळातील राहणीमान, बांधकाम , विविध कला यांचा अभ्यास केला. गड , किल्ले बांधताना विज्ञानाचा वापर कसा केला गेला याची माहिती घेताना विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटले.

तर सालरजंग म्युझियमला भेट देऊन विविध राज्यकर्त्यांची माहिती विद्यार्थ्यांनी मिळविली.शेवटी रामोजी फिल्मसिटीला भेट देऊन चित्रपट निर्मितीमधील विविध तंत्राची माहिती घेतली. बालदिनानिमित्त आयोजित या विमान सहलीमुळे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. बालदिनानिमित्त आयोजित विमान सफरीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.