Nigdi : जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा महोत्सव 2024 ची प्राथमिक फेरी संपन्न

एमपीसी न्यूज – मधुश्री कला आविष्कार  प्राधिकरण,निगडी आणि रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव  यांनी ( Nigdi) आयोजित केलेल्या पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती, संमिश्र जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा महोत्सव 2024 ची  प्राथमिक फेरी मोठ्या उत्साहाने  ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी येथे संपन्न झाली.

निगडी  केंद्राचे बाह्य परिक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी किरण येवलेकर    व  अंतर्गत परिक्षक म्हणून रंगकर्मी कवी,लेखक अजीज सय्यद  यांनी परीक्षण केले. केंद्रप्रमुख उज्वला केळकर  यांनी सूत्रसंचालन केले .

Pune : ED विरोधात उद्या राष्ट्रवादीचे जाहीर निषेध आंदोलन

मधूश्री कला आविष्कार चे सदस्य सर्वश्री रमेश वाकनीस ,  राज अहेरराव ,श्री राजेन्द्र बाबर , विनायक गुहे यांनी  ह्या स्पर्धेचे आयोजन व  नियोजन केले. नेहा कुलकर्णी यांनी संयोजन केले.

पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सौ ज्योती कानेटकर ज्येष्ठ रंगकर्मी , लेखिका या होत्या .तसेच कार्याध्यक्ष सलिम शिकलगार ही  उपस्थित होते.

संस्थापक अध्यक्षा माधुरी ओक यांनी प्रास्ताविक केले. रंगगंध कलासक्त न्यास चे उपाध्यक्ष अशोक अडावदकर हे रंगगंधचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते, त्यांनी  प्राथमिक फेरी चे निकाल वाचन केले व आभार मानले.

एकूण बारा संघ सहभागी झाले होते.सांघिक आणि वैयक्तिक वाचिक अभिनय या साठी निवड करण्यात आली. सांघिक पारितोषिक प्रथम संघ –कलाविष्कार मंच, चाकण, काळेवाडी, पिंपरी

स्वलिखित संहितेचे नाव होते — ‘कागद ‘ ज्योती आपटे,सुमित दोंतुलवार,पुनर्वसु इंगळे यांचा सहभाग ( Nigdi) होता.

द्वितीय संघ — साईनाथ बालक मंदिर –चिंचवड — स्वलिखित संहितेचे नाव — विधिलिखित

यात सहभाग घेतला होता वैभवी तेंडूलकर,स्वाती कुलकर्णी,प्रज्ञा पाठक, मानसी कुंभार,रेवती नाईक.

तृतीय संघ — शब्दयात्री – यमुना नगर निगडी स्वलिखित संहितेचे नाव — पुनर्जन्म एआय (AI) चा — यात सहभाग घेतला ऋतुराज बुध्दीसागर व नेहा बोंगाळे

वैयक्तिक वाचिक अभिनय या साठी , कुसुम जाधव — कुसुमांजली संघ अलका करंदीकर– त्रिवेणी संघ ऋतुराज बुद्धीसागर– शब्द यात्री संघ

सोनाली श्रीखंडे — त्रिविधा संघ आणि अनुराधा मराठे– गुरुकृपा संघ .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.