Pune : केसनंद येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई

एमपीसी न्यूज – केसनंद इंदिरा सिटी येथील 2 अनाधिकृत (Pune)बांधकामांवर कारवाई करण्यात आली. सुमारे  11970स्क्वे.फुट क्षेत्राचे निष्कासन कारवाई पुणे महानगर प्रदेश विकास यांच्यामार्फत करण्यात आली.

यावेळी पीएमआरडीएचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अनधिकृत (Pune)बांधकाम करू नये, असे आवाहन PMRDA च्या सहआयुक्त मोनिका सिंह यांनी केले आहे.

Pune : सामाजिक भान असणाऱ्या तरुणांची समाजाला गरज; 7 व्या युवा संसदेत मान्यवरांचे मत 

दरम्यान, आगामी काळातही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. अनधिकृत बांधकामांमुळे सामान्य माणसाची फसवणूक होते. त्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ येते.

महापालिका क्षेत्रात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. गुंठा 2 गुंठेमध्ये ही बांधकामे करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी 4 ते 5 मजले चढविण्यात आले आहेत. लिफ्ट सोयीसुविधा नसल्याने सामान्य माणसाला पायऱ्या चढवूनच जावे लागते.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.