Pimple Saudagar : उद्यानाच्या जागी जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉल तयार – नाना काटे

एमपीसी न्यूज : प्रभाग क्र. 28 रहाटणी पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथील स्वराज गार्डन शेजारील आरक्षण क्र. 361 मधील गार्डनचे आरक्षण बदलून त्याजागी जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉल तयार करण्याची मागणी माजी नगरसेवक नाना काटे यांनी महापालिकेकडे केली.

याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. 28 रहाटणी पिंपळे सौदागर येथील स्वराज गार्डन शेजारील सर्वे न. 21 मध्ये आरक्षण क्र. 361 नुसार गार्डनचे आरक्षण आहे. ते बदलून त्याजागी जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉल करावा.

सद्यस्थितीत पिंपळे सौदागर या प्रभागात महापालिकेच्या वतीने सर्व सोयीसुविधा युक्त असे 3 गार्डन व 2 प्ले ग्राउंड विकसित करण्यात आली आहेत. नागरिक देखील त्याचा मनसोक्त पद्धतीने आनंद घेतात. पिंपळे सौदागर परिसरात एकूण 230 व त्यापेक्षा जास्त निवासी सोसायटी आहेत. त्यामधील सर्व नागरिकांना जलतरण तलाव व बॅडमिंटनच्या सरावासाठी पिंपरी, कासारवाडी,पिंपळे गुरव, थेरगाव, किवा खासगी ठिकाणी येथे जावे लागते.

नागरिकांची ही परवड पाहता पिंपळेसौदागर येथे आता गार्डनची गरज नसल्याने तसेच सर्वात जास्त कर भरणारे नागरिक या परिसरात राहतात. त्या करदात्यास सोयीसुविधा देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. परिसरातील (Pimple Saudagar) नागरिक पिंपळे सौदागर परिसरात जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉल बांधावा अशी सातत्याने मागणी करत असतात. नागरिकांची ही मागणी रास्त असल्याने याचा विचार करता पिंपळे सौदागर मधील नागरिकांना या परिसरात जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉलची सुविधा देणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Mp Shrirang Barne : मावळमधील दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप, गुणवंतांचा सन्मान

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.