Kothrud : निषाद बाक्रे व विदुषी मंजिरी असनारे-केळकर यांच्या गायनाने रंगली ‘संगीत संध्या’

एमपीसी न्यूज : सवाई गंधर्वांचे नातू (Kothrud) आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य स्वर्गीय पं. श्रीकांत देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्याच्या उद्देशाने पं श्रीकांत देशपांडे मित्र परिवार आणि त्यांच्या पत्नी शीला देशपांडे यांच्या वतीने आयोजित ‘संगीत संध्या’ निषाद बाक्रे व विदुषी मंजिरी असनारे केळकर यांच्या सुमधुर गायनाने रंगली. सदर वर्ष हे कार्यक्रमाचे 11 वे वर्ष होते. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

सुप्रसिद्ध तबलावादक तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर, माजी आमदार उल्हास पवार, डॉ. विकास कशाळकर, मीरा पणशीकर आणि मीरा फातर्पेकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

निषाद बाक्रे यांनी राग मुलतानीने आपल्या गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी ‘कवन देस गयी…’ ही विलंबित झुमरा तालातील बंदिश, द्रुत तीन तालातील ‘मोरे मंदिरवा…’ हा ख्याल सादर केला. यानंतर त्यांनी राग नट कामोद सादर केला.

यामध्ये त्यांनी ‘नेवर बाजो रे …’ ही विलंबित तीनतालातील बंदिश आणि ‘साची काहो तुम प्यारे…’ हा ख्याल गायला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) आणि श्रीरंग दातार, चिन्मय लेले (तानपुरा) अशी साथसंगत होती.

यानंतर मंजिरी असनारे- केळकर यांनी राग मारुबिहाग (Kothrud) गायला. यामध्ये त्यांनी ‘रसिया हो ना जा…’ ही विलंबित तीन तालातील रचना प्रस्तुत केली. राग परजमध्ये ‘अखियां मोरी…’ या झपतालातील बंदिशीने त्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) आणि देवश्री नवघारे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. आनंद देशमुख यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Pimple Saudagar : उद्यानाच्या जागी जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉल तयार – नाना काटे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.