Pune Metro : दुबई येथे आयोजित कार्यक्रमात जे. पी. श्रॉफ यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज – क्रेडाई पुणे मेट्रोच्या व्यवस्थापकीय (Pune Metro) समितीचे सदस्य जे. पी. श्रॉफ यांचा नुकताच दुबई येथे झालेल्या इंडिया प्रॉपर्टी पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार देत सन्मान करण्यात आला. दुबईच्या राजघराण्यातील शेख मुहम्मद यांच्या हस्ते मानचिन्ह देत श्रॉफ यांचा सन्मान करण्यात आला.

मॅक्स प्रो आणि इंडिया प्रॉपर्टी अवॉर्ड यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुशल क्रेडाई अंतर्गत भारतातील बांधकाम कामगारांचे कौशल्य वाढविण्यासाठी श्रॉफ यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ‘सीएसआर स्कीलिंग कन्स्ट्रक्शन वर्कर्स फॉर क्रेडाई’ या विभागात श्रॉफ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

ब्राझीलमधील 2015 साली साओ पाओलो, युनायटेड (Pune Metro) अरब इमिरातीमधील अबू धाबी 2017 साली आणि 2019 मध्ये रशियातील कझान येथे संपन्न झालेल्या जागतिक कौशल्य स्पर्धांमध्ये श्रॉफ यांनी कुशल क्रेडाई उपक्रमाचा एक भाग असलेल्या संघांचे नेतृत्व केले होते विशेष म्हणजे या सर्व ठिकाणी त्या त्या संघाने पदके मिळविली. त्यामुळे या क्षेत्रात श्रॉफ यांनी आजवर केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.

Kothrud : निषाद बाक्रे व विदुषी मंजिरी असनारे-केळकर यांच्या गायनाने रंगली ‘संगीत संध्या’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.