PimpleSaudagar : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते ई-स्कूटर सेवेचे उदघाटन

एमपीसी न्यूज – नगरसेवक शत्रुघ्न(बापु)काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी पुन्हा एक पाऊल स्मार्ट सिटीकडे वळवत ग्रीन सौदागर क्लिन सौदागर हा ध्यास मनात घेऊन प्रथमच पिंपळे सौदागर येथे हिरो कंपनीची लीप ई-स्कूटर सेवा आज पासुन कार्यरत करण्यात आली आहे. या ई-स्कूटर सेवेचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

गेल्या काही दिवसा पूर्वी प्रथम टप्यात ट्रायल बेसेसवर विस इ-स्कुटरचे नियोजन करण्यात आले होते आज शिव छत्रपती शिवाजी महाराज लिनियर अर्बन गार्डन येथे या इ-स्कूटरचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.पवना सहकारी बँकेचे व्हाइस .चेअरमन जयनाथ काटे, उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, चंदा भिसे, भानुदास काटे पाटील, शंकर आण्णा काटे, दत्तोबा काटे, शेखर कुटे, प्रकाश झिंजुर्डे,.पोपट काटे, विशाल शिंदे, राहुल सरोदे,विकास काटे ,संजय भिसे, प्रविण कुंजीर, गणेश झिंजुर्डे, .नितीन कुंजीर, अमोल थोरात, दिपक गांगुर्डे आदी उपस्थित होते.

  • ही ई-स्कूटर Android App द्वारे चालू किंवा बंद करता येते ही ई-स्कूटर इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे एकदा फुल्ल चार्ज केल्यावर ६० कि.मि.चालवता येत. ह्या ई-स्कूटर ला चार्जिंगसाठी ४ ते ५ तास लागतात इ-स्कुटरची टॉप स्पीड ही २५ कि.मि. प्रति तास आहे. वाढती महागाई आणि वाढते प्रदूषनाला आळा घालण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी ही संकल्पना प्रथमच पिंपळे सौदागर रहिवाशांसाठी ई-स्कूटर ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

ई-स्कूटर चालवण्यासाठी पाहिले १५ मि. राईड फ्री असणार आहे त्यानंतर इ-स्कुटर चालवण्यासाठी १.५० रु पर मिनिट आहे पैसे पेड करण्यासाठी UPI अप्स द्वारे पैसे पेड करून ई-स्कूटरचा आनंद नागरिकांना घेता येईल.

  • नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे पिंपळे सौदागरमधील नागरिकांच्या स्वास्थ व आरोग्याची काळजी घेत पिंपळे सौदागर मध्ये अनेक ठिकाणी असलेले पेडल सायकल पॉईंट आहेत त्याच ठिकाणी या ई-स्कूटर पॉईंट आणि ई-स्कूटर चार्जिंग पॉईंट असल्याचे नियोजन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.