Pimpri: महापालिकेच्या विशेष मोहिमेद्वारे एकाच दिवशी पकडली 126 डुकरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने डुकरे पकडण्याची विशेष मोहिम हाती घेतली आहे. तीन दिवसांपासून डुकरे पडकली जात आहेत. आज (सोमवारी) एकाच दिवशी 126 डुकरे पकडण्यात आली आहेत. मासुळकर कॉलनी, अजमेरा, मोरवाडी कोर्ट परिसर, पिंपरी, काळेवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरात उपद्रव करणारे, आरोग्यास हानिकारक डुकरांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या नागरिक, नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. डुकरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने डुकरे पकडणे व त्यांची विल्हेवाट लावण्याचे कामकाज परराज्यातील ठेकेदाराला दिले आहे.

ठेकेदाराने डुकरे पकडण्यासाठी 20 कामगारांचे पथक केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेने डुकरे पकडण्याची मोहिम हाती घेतली आहे. पहिल्यादिवशी भाटनगर, लिंकरोड, डाल्को कंपनी, थेरगाव या ठिकाणी कारवाई करुन 108 डुकरे पकडण्यात आली होती.

आज (सोमवारी) एकाचदिवशी 126 डुकरे पकडण्यात आली आहेत. मासुळकर कॉलनी, अजमेरा, मोरवाडी कोर्ट परिसर, पिंपरी, काळेवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहर डुक्कर मुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन डुकरे पकडण्याची कारवाई सुरु आहे.

डुकरांचा वावर असलेल्या स्थानांची माहिती महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. त्या ठिकाणी असलेली डुकरे पकडण्याकरिता पशुवैद्यकीय विभागामार्फत मोहिम राबविण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.