Pimpri: भोसरी, दिघी, बोपखेल चऱ्होलीत 25 रुग्ण; रावेत, किवळे, चिंचवड कोरोनामुक्त

आजपर्यंत  62 जणांना कोरोनाची लागण; एकाचा मृत्यू, 17 कोरोनामुक्त, 44 सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे शहर कंटेनमेंन्ट झोन म्हणून घोषित केले आहे. शहराच्या सीमा 27 तारखेपर्यंत पुर्णपण बंद केल्या आहेत. आजपर्यंत शहरातील 62 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये भोसरी, दिघी, बोपखेल, च-होली हा भाग येत असलेल्या ‘इ’ प्रभाग कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. या प्रभागात सर्वाधिक 25 रुग्ण आहेत. तर, रावेत, किवळे, मामुर्डी, चिंचवडचा भाग येत असलेला ‘ब’ प्रभाग अद्यापर्यंत कोरोनामुक्त आहे.

महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. त्यामध्ये कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या ‘इ’ प्रभागात रुग्णांची संख्या वाढतच आहे. आजपर्यंत 25 कोरोनाबाधित रुग्ण या भागात आहेत. त्यामुळे या भागाकडे संपुर्ण शहराचे लक्ष लागले आहे.  तर,  ‘ब’  प्रभाग अद्यापपर्यंत कोरोनामुक्त आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय रुग्ण संख्या!

‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या आकुर्डी, निगडी, संभाजीनगर, शाहुनगर, मोहननगर भागात (कोरोनाचे दोन पॉझिटीव्ह रुग्ण आहेत)

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, किवळे, मामुर्डी,  बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड भागात (कोरोनाचा एकही रुग्ण नाही).

‘क’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या खराळवाडी, नेहरूनगर, अजमेरा, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर, मोशी, चिखली भागात (कोरोनाचे आठ रुग्ण आहेत)

‘ड’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पुनावळे, ताथवडे,  पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात (कोरोनाचा एक रुग्ण आहे).

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, दिघी, बोपखेल,चऱ्होली भागात (कोरोनाचे सर्वाधिक 25 रुग्ण आहेत).

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर,  यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या भागात ( कोरोनाचे दोन रुग्ण आहेत).

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी भागात (कोरोनाचे दोन रुग्ण आहेत).

‘ह’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, कासारवाडी, दापोडी,फुगेवाडी,  नवी सांगवी, सांगवी भागात (कोरोनाचे चार रुग्ण आहेत).

शहरात 44 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर, 17 जण कोरोनामुक्त झाले आहे. आजपर्यंत 62 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.