Pimpri : महर्षी वाल्मिकी विचार प्रबोधन पर्वात 46 सफाई कर्मचा-यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची जयंती (Pimpri ) उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयात अभिवादन प्रसंगी आरोग्य विभागप्रमुख यशवंत डांगे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, विधीतज्ञ ॲड. सागर चरण, प्रभारी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक , कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी अनिल लखन उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते राकेश राजोरिया, राजू परदेशी, राजेश बडगुजर, रघुबीरजी ढकोलिया, कुणाल बेद, संदीप बर्डे यांनी देखील मुख्य इमारतीमधील महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

तर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय,संत तुकारामनगर येथील कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.उज्वला आंदूरकर, आरोग्य निरीक्षक राजकुमार वाघमारे, सिस्टर इनचार्ज सविता निगडे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वाल्मिकी विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब (Pimpri )आंबेडकर पुतळ्या शेजारी मोकळ्या मैदानात करण्यात आले होते.

या प्रबोधन पर्वास आरोग्य विभागप्रमुख यशवंत डांगे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, विधीतज्ञ ॲड. सागर चरण तसेच सामाजिक कार्यकर्ते अजिझ शेख, मोहसीन शेख,मुख्य लिपिक वसिम कुरेशी,अभिजीत डोळस आदी उपस्थित होते.

या प्रबोधन पर्वाच्या प्रारंभी महापालिकेच्या वतीने आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील सफाई कामगार, वॉर्डबॉय, आया यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

Dighi : गाडीची तोडफोड करत कोयता घेऊन गल्लीत गोंधळ घालणाऱ्या दोघांना अटक

त्यामध्ये मनोहर सारसर, अनंत पिल्ले, मीनाक्षी चटोले, राखी घोडके, संजय गेंगजे, गीता वाल्मिकी, अंजु डिलोट, सुदेश वाल्मिकी, सागर विटकर, शामराव ठाकर, राजेंद्र वाल्मिकी, सुमन ओव्हाळ, माया लोट, दीपक कोटीयाना, जगदीश डोळस, मनोहर अवतारे, संजना जाधव, मैना फुगे, उद्धव डवरी, सुनीता कांबळे, बाली उर्फ मंगल साळवे, डिलोर कन्हैयालाल, श्रीकृष्ण वाल्मिकी, दिपक परदेशी, सुरेश ताडगे, शोभा दलाल, सुनीता माझिरे, किशोर बावीसकर, रमेश काटे, सारिका कांबळे, भगवती झेंडा, गजानन बागल, शेखर राऊत, संजीवनी जाधव, अलका आढारी, मारुती केवळे, संगिता जाधव, अलका भेगडे, आशा जाधव, सचिन नागरे, दिपक सारसर, हनुमंत मांजरे, उमेश चिल्लाळ, शंकर झडपे, सरोज ढोरे, ज्योती गायकवाड या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

सफाई कर्मचारी आणि उपस्थितांसाठी बहारदार हिंदी, मराठी गीतांसह महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष होम मिनिस्टर- खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,ज्यामध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन उस्फुर्त प्रतिसाद दर्शवला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.