Pimpri : आपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

एमपीसी न्यूज : आम आदमी पार्टीच्या (Pimpri) वतीने पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करील, तो समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध बंड करून उठल्याशिवाय राहणार नाही’ शिक्षणाचे महत्त्व विशद करणारा हा प्रेरणादायी मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी 1949 मध्ये त्यांच्या जन्मदिनीच औरंगाबादेतून जगाला दिला होता. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालून आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत मोफत शिक्षण कसे पोहचेल? या विचाराने गेली 10 वर्षे काम करत आहेत. आणि दिल्लीमध्ये सरकारी शाळा संपूर्णपणे मोफत शिक्षण देत आहेत. असे आप प्रवक्ते प्रकाश हगवणे यांनी म्हटले.

यावेळी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर (Pimpri) संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, आप महिला नेत्या सिताताई केंद्रे, डॉ. अमर डोंगरे, आप प्रवक्ते प्रकाश हगवणे, आप सफाई कामगार संघटना अध्यक्ष किशन चावरिया, सुरेश बावनकर, डॉ. रामेश्वर मुंडे, के.टी बारापात्रे, सुनील शिवशरण, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Pimpri News – पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महपरिनिर्वाण दिनी अभिवादन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.