Pimpri : महापालिकेच्या आठही प्रभाग समित्या अपेक्षेप्रमाणे भाजपच्या हाती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभाग समितीवर अपेक्षप्रमाणे भाजपचे वर्चस्व राहिले. प्रभाग समिती अध्यक्षपदांची निवडणूक आज (गुरुवारी)बिनविरोध पार पडली असून भाजपच्या शर्मिला बाबर, करुणा चिंचवडे, यशोदा बोइनवाड, शशिकांत कदम, सुवर्णा बुर्डे, योगिता नागरगोजे, अर्चना बारणे आणि अंबरनाथ कांबळे हे अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.

महापालिका मुख्यालयातील मधुकर पवळे सभागृहात सकाळी साडेअकरा वाजल्यापासून निवडणुकीला सुरुवात झाली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. अर्ज भरण्याच्या मुदतीत प्रत्येक प्रभागातून एकाच उमेदवाराचा अर्ज प्राप्त झाला होता. त्यामुळे आठही प्रभाग समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली.

दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले असले तरी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली नाही. आचारसंहिता असल्याने नवनियुक्त प्रभाग अध्यक्षांना आणखीन 15 ते 20 दिवस महापालिकेचे वाहन वापरण्यासाठी मिळणार नाही.

हे आहेत नवीन प्रभाग अध्यक्ष

‘अ’ प्रभाग समिती – शर्मिला बाबर
‘ब’ प्रभाग समिती – करुणा चिंचवडे
‘क’ प्रभाग समिती – यशोदा बोइनवाड
‘ड’ प्रभाग समिती – शशिकांत कदम
‘इ’ प्रभाग समिती – सुवर्णा बुर्डे
‘फ’ प्रभाग समिती – योगीता नागरगोजे
‘ग’ प्रभाग समिती – अर्चना बारणे
‘ह’ प्रभाग समिती – अंबरनाथ कांबळे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.