Pimpri: ‘महापालिका शिक्षण समिती प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची चौकशी करा’

माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीतील राज्य शासनाच्या प्रतिनियुक्तीवरील कार्यरत असलेल्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या कार्यपद्धतीविषयी प्रचंड तक्रारी आहेत. यामुळे शिदे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे. शिक्षण विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे चालू शैक्षणिक वर्षात मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यापासून वंचित रहावे लागले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात नाही. शिक्षण समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने प्रशासनाकडून कामकाज सुरु आहे.

प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना शिक्षणाधिकारी म्हणून बढती देताना कोणते निकष लावले होते ?. यापूर्वी, त्यांनी कोणत्या ठिकाणी काम केले होते ? याची सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी तापकीर यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.