Pimpri : पिंपरी-चिंचवड व मावळातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल बंद ठेवण्याचा निर्णय

एमपीसी न्यूज – जगभर धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासन व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत न्यू पिंपरी-चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने पिंपरी-चिंचवड व मावळातील सर्व ड्रायव्हिंग स्कूलची कार्यालये तसेच प्रशिक्षण 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यू पिंपरी-चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचे संकट हे राष्ट्रीय संकट असून त्यासाठी प्रत्येक नागरिकाने कर्तव्य भावनेने शासनाच्या प्रत्येक आदेशाचे वेळोवेळी पालन करावे, व्यापक समाजहिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत असून त्याचे गांभीर्याने पालन करणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग स्कूलचे सर्व प्रशिक्षणार्थी व ग्राहक हे देखील त्यासाठी सहकार्य करतील, असा विश्वास संघटनेच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.