Chinchwad : चिंचवड भाजी मंडई शनिवारी बंद

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी (दि.21) चिंचवड भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, या दिवशी भाजी मंडईमध्ये औषध फवारणी केली जाणार असून, नागरिकांनी मंडई मध्ये प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हि फवारणी केली जाणार असल्याचे चिंचवड भाजी मंडई समितीतर्फे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.