_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri: अण्णा भाऊ साठे जन्माशताब्दी होणार ऑनलाइन, वेबिनारच्या माध्यमातून विविध कार्यक्रम

Annabhau Sathe Birth centenaryi will be online, various programs through webinars

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पालिका आणि अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने अण्णा भाऊ साठे यांची जयंती यंदा ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत अण्णा भाऊ साठे यांचे कार्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी वेबिनार घेण्यात येणार आहे अशी माहिती, महापौर उषा ढोरे आणि सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, अण्णा भाऊ साठे जंयती महोत्सवाचे अध्यक्ष दत्ता चव्हाण, कार्याध्यक्ष नितीन घोलप, खजिनदार शिवाजी साळवे उपस्थित होते.

या वर्षी शहरावर करोनाचे सावट आहे. त्यामुळे जयंती एकत्र येऊन साजरी करणे शक्‍य नाही. सार्वजनिक कार्यक्रम घेण्यावर बंदी आहे.

त्यामुळे 1 ते 5 ऑगस्ट या कालावधीमध्ये जयंती महोत्सव वेबिनारच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटनही ऑनलाईन केले जाणार आहे. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आण्णा बनसोडे, महापौर, सर्व पक्षाचे गटनेते उपस्थित राहणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पाच दिवस विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे. त्यांचे चित्रीकरण लाइव्ह स्वरुपात नागरिकांना बघायला मिळणार आहे.

चित्रीकरण वेळी कमीतकमी व्यक्तींमध्ये केले जाणार आहे. त्याच्या लिंक नागरिकांपर्यंत पोहचविल्या जाणार आहेत. अण्णा भाऊ साठे यांची शंभरावी जयंती असल्यामुळे शंभर कार्यकर्ते रक्तदान करणार आहे.

यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी एकावेळी फक्त पाच जणांना रक्त दान करता येणार आहे. तसेच कार्यकर्ते शंभर झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करणार आहे, असे ढाके यांनी सांगितले.

कोरोनाचे सावट असले तरी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे विचार घराघरापर्यंत पोहचविण्यात येणार आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेतले जाणार आहे.

अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची माहिती देण्यासाठी एक संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याचेही उद्घाटन यावेळी केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.