Pimpri : कामावर घेतले नाही म्हणून दुकानात घुसून दहशत पसरविण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – कामावर का घेतले नाही? या रागातून (Pimpri) एका माथेफिरूने दुकानात घुसून त्याच्या साथीदारांसह गोंधळ घातला आहे. तसेच, धमकी देत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार पिंपरी मार्केटमध्ये शनिवारी (दि.14) घडला आहे.

याप्रकरणी नारायण गोपीचंद चावला (वय 47, रा. काळेवाडी) यांनी सोमवारी (दि.16) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवम य़ादव (वय अंदाजे 20, रा. पिंपरी) व त्याचे 5 साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

Moshi News : ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या कार्यालयांसाठी कचरा डेपोतील जुनी बांधकामे पाडणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी शिवम याला (Pimpri) कामावर घेतले नाही या रागातून शिवम हा त्याच्या साथीदारांसह हातात सिमेंटचे गट्टू घेऊन दुकानात घुसला. यावेळी त्याने पुलीसात तक्रार केली, तर सोडणार नाही असे धमकावून गोंधळ घातले. तसेच, परिसरातील लोकांनाही आमच कोणी काही बिघाडू शकत नाही, असे जोरजोरात ओरडून परिसरात दहशत पसरवली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.