Pimpri : विवाहातील अनावश्यक खर्च टाळून रानवडे परिवाराकडून अनाथाश्रमसह वृद्धाश्रमाला मदत

एमपीसी न्यूज – विवाह समारंभातील मिरवणूक, डीजे, सत्कार सोहळा आदी खर्चिक उपक्रमांना फाटा देऊन पिंपरी येथील रानवडे कुटुंबाने गुरूकुलम अनाथालय आणि किनारा वृद्धाश्रमाला आर्थिक मदत आणि खाऊ वाटप केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य शासनाचा उत्थान पुरस्कार प्राप्त पिंपरीतील ॲड. लक्ष्मण रानवडे यांचे सुपूत्र ॲड. सुनिल रानवडे यांचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला.

  • या लग्न कार्यक्रमासाठी रानवडे परिवाराने डीजे, मिरवणूक, सत्कार, सजावट, रोषणाई आदी सर्व वाचवून सदर रक्कम क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या गुरूकुलम आश्रमाला सुमारे २१ हजार २२१ रूपये मदतनिधी दिला. तसेच येथील मुलांना खाऊ वाटप केले.

याचबरोबर कामशेत येथील किनारा वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना मिष्टान्न भोजन देऊन वधू-वरांनी त्यांचा आशिर्वाद घेतला.

किनारा वृद्धाश्रमाला भोजन प्रदान करताना (डावीकडून) राजू शिवतारे, विजय जगताप किनारा वृद्धाश्रमाचे संचालक सुभाष देशमुख आणि अ‍ॅड. लक्ष्मण रानवडे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.