Pimpri : भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीच्या वतीने सफाई कामगार व पोलीस कर्मचाऱ्यांना अल्पोपहार

एमपीसी न्यूज – महानगरपालिकेच्या सफाई कामगार तसेच पोलीस कर्मचारी व गोरगरीबांना अल्पोपहाराचे वाटप भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीच्या वतीने गुरुवारी (दि.9) करण्यात आले. कोरोना सारख्या जीवघेण्या आजारात बाहेर भीषण परिस्थिती उद्भवली आहे, अशा परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून मेहनत घेणाऱ्या सफाई कामगार व पोलीस कर्मचाऱ्यांविषयी सद्भावना म्हणून अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप कांबळे आणि मागासवर्गीय समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षा जयश्री कांबळे यांच्या उपस्थितीत अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या कामासाठी राजाभाऊ सूर्यवंशी आणि धीरज चंचलानी यांचे सहकार्य लाभले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन व इतर यंत्रणा काम करत आहे. अशा आणीबाणीच्या प्रसंगी पोलीस यंत्रणा व सफाई कामगार फार मोलाची भूमिका बजावत आहेत. तसेच गोरगरिबांचे जेवणाचे हाल होत आहेत त्यामुळे याकामी खारीचा वाटा म्हणून अल्पोपहार वाटपाचे काम हाती घेतले असे भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप कांबळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.