Pune : बँक ऑफ इंडियातर्फे 500 कुटुंबाना, पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंची मदत 

एमपीसी न्यूज – बँक ऑफ इंडियाच्या पुणे विभागातर्फे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाच्या अंतर्गत 500 गरजू कुटुंबांना एक महिना पुरेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोथरूड पोलीस स्टेशनला 180 फुल साईज् सुती हातमोजे देण्यात आले. तसेच कॉरोना विरुद्ध लढण्यासाठी नायडू हॉस्पिटलला इंडस्ट्रीयल वॉशिंग मशीन देण्यात आले.
याप्रसंगी पुणे महानगर पालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसे नेते किशोर शिंदे व संजय काळे, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड,  अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, सहाय्यक आरोग्य अधिकारी साबणे, कोथरूड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ निरीक्षक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

बँक ऑफ इंडियाच्या वतीने महाव्यवस्थापक रमेश ठाकूर, उपमहाव्यवस्थापक कुलकर्णी, विभागीय व्यवस्थापक राजेश इंगळे, उपव्यवस्थापक सदाशिव कुलकर्णी, बँक ऑफ इंडिया कर्मचारी संघटनेचे  सचिव राणे, उपाध्यक्ष ठोंबरे, ऑफिसर असोसिएशनचे सचिव मादुर, विपणन विभागाचे अधिकारी नीलेश काळोखे, मंगेश वैद्य, निलेश वर्पे आणि सागर भालसिंग उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.